Monday, May 27, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट

नवी दिल्ली | New Delhi

येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे व नातू रुद्रांश यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) भेट घेतली.

- Advertisement -

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांची संख्या २२ वर; १०० हून अधिक लोकांची ओळख पटली

मुख्यमंत्री शिंदे काल मध्यरात्री १ वाजता दिल्लीत (Delhi) पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे संपूर्ण कुटुंब होते. त्यावेळी शिंदे दिल्लीत अचानक आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यानंतर आज दुपारी त्यांनी कुटुंबासोबत पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली.

Irshalwadi Landslide : उद्धव ठाकरे इर्शाळवाडीत, ग्रामस्थांना धीर देत दिलं ‘हे’ आश्वासन; म्हणाले…

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत (family) ही भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे म्हटले. तसेच पंतप्रधान मोदींनी आम्हाला बराच वेळ दिला. पंतप्रधानांना भेटायची सर्वांची इच्छा असते. त्यामुळे आम्ही ही भेट घेतली. या भेटीसाठी आज आमच्या चार पिढ्या एकत्र होत्या याचा विशेष आनंद होता, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

“मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री…”; आमदार अमोल मिटकरींचे सूचक ट्वीट

तसेच पंतप्रधानांची भेट घेतल्याने वडिलांना समाधान वाटले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. मोदी माझ्या नातवाबरोबर खेळले. आज आईसोबत नव्हती त्याची कमतरता होती. आई जिव्हाळ्याचा विषय आहे. पण ती नाही, तिचा आशीर्वाद आहेच, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. यावेळी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना देखील भेटणार असल्याचे शिंदेंनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

ही दोस्ती तुटायची नाय! फडणवीस-अजित पवारांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा; बॅनरवर पहाटेच्या शपथविधीच्या फोटोचाही समावेश

- Advertisment -

ताज्या बातम्या