Sunday, September 15, 2024
Homeमुख्य बातम्याMaharashtra Politics : शिंदे-फडणवीसांची बंद दाराआड मंत्र्यांसोबत बैठक; काय झाली चर्चा?

Maharashtra Politics : शिंदे-फडणवीसांची बंद दाराआड मंत्र्यांसोबत बैठक; काय झाली चर्चा?

मुंबई | Mumbai

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीत ११ मोठे निर्णय घेण्यात आले.मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्या सरकारमधील मंत्र्यांसोबत बंद दाराआड जवळपास २० ते २५ मिनिटे चर्चा केली. तसेच मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी काल पत्रकार परिषद घेत मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण देण्यास विरोध दर्शविला होता. याचेही पडसाद आजच्या मत्रिमंडळाच्या बैठकीत उमटल्याचे पाहायला मिळाले…

Maharashtra Rain : राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाची हजेरी; शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) संपल्यानंतर बंद दाराआड बैठक घेत आपापल्या मंत्र्यांना सरकारमध्ये समन्वय ठेवण्याच्या सूचना केल्याचे समजते. तसेच राज्याला पुरोगामी विचारांची परंपरा असून महायुतीमधील (Mahayuti) मतभेद बाहेर जात असतील तर ते चुकीचे आहे, त्यामुळे समन्वय ठेवण्याची सरकारची जबाबदारी आहे, अशा सूचना करत मंत्र्यांचे कान टोचले. तसेच महायुतीत विसंवाद असल्याचे चित्र बाहेर जनमाणसांत जाऊ नये, यासाठी समन्वय ठेवा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

Chhagan Bhujbal : आम्हाला ओबीसीतून बाहेर ढकलण्याचा डाव; भुजबळांचा गंभीर आरोप

दरम्यान, दुसरीकडे मराठा समाजाला (Maratha Community) सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी करत ओबीसींनी दंड थोपटले आहे. यावर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला आरक्षण द्या, पण स्वतंत्र्य आरक्षण द्या, ओबीसींच्या वाट्यातील आरक्षण देऊ नका, असे म्हणत आपली भूमिका मांडली. त्यानंतर या मुद्द्यावर सविस्तर चर्चा होऊन सर्व मंत्र्यांनी सामंज्याची भूमिका घेणे जरुरी आहे, असे एकमत या बैठकीत झाल्याचे सांगितले जात आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Cabinet Meeting : राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

- Advertisment -

ताज्या बातम्या