Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्या'रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला' - एकनाथ शिंदे

‘रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला’ – एकनाथ शिंदे

मुंबई । Mumbai

काल राज्याच्या विधानसभेत बहुमत चाचणीत शिंदे सरकारने (shinde government) यश प्राप्त केले. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर सर्व पक्षीय नेत्यांची जोरदार भाषणे झाली. याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm Eknath Shinde) यांनी देखील रोखठोक भाषण केले. शिंदे यांनी “शिवसेना वाचवण्यासाठी मी शहीद झालो, तरी चालेल पण मागे हटणार नाही” असे म्हटले होते. तसेच अन्यायाविरुद्ध बंड करणे ही बाळासाहेबांचीच शिकवण असल्याचेही ते म्हणाले होते. यावरून शिवसेना पक्षप्रमुख (shivsena cheif) उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आज शिवसेनेच्या महिला मेळाव्यात एकनाथ शिंदेंवर टीका केली होती…

- Advertisement -

काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती. त्याला ब्रेक नव्हता. सुसाट सुटली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन होते, की अपघात तर होणार नाही ना…. असा टोला शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला होता. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी देखील ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला आहे, कारण हे सर्वसामान्यांचे सरकार आहे.असे म्हणत शिंदे यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या