नाशिक | Nashik
आज नाशकात (Nashik) ‘शासन आपल्या दारी’ (Shasan Aaplya Dari) कार्यक्रम पार पडत असून कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) अजित पवार (Ajit Pawar) यांचे आगमन झाले आहे…
Ajit Pawar : पुणे-नाशिक रेल्वे मार्गावर लवकरच तोडगा काढणार; अजित पवारांचे नाशकात विधान
आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे ‘वंदे भारत एक्सप्रेस’ने (Vande Bharat Express) नाशिकमध्ये (Nashik) दाखल झाले होते. त्यानंतर त्यांचे राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर (Ozar Airport) आगमन झाले. त्यानंतर त्यांनी कार्यक्रमस्थळ असणाऱ्या डोंगरे वस्तीगृहाकडे रवाना होत कार्यक्रमस्थळी हजेरी लावली.
Ajit Pawar : उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजितदादा पहिल्यांदाच नाशकात; पायी चालत केलं जोरदार शक्तिप्रदर्शन
दरम्यान, सदर कार्यक्रमासाठी कार्यक्रमस्थळी लाभार्थी मोठ्या संख्येने दाखल झाल्याचे पाहायला मिळत असून डोंगरे वस्तीगृह मैदान जवळपास भरलेले दिसत आहे. तसेच कार्यक्रमासाठी प्रत्येक लाभार्थीला कार्ड देण्यात आले आहे. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कार्यक्रमस्थळी पोलिसांचा (Police) चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...
Ajit Pawar : …म्हणून मी ‘सिल्व्हर ओक’वर गेलो; अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण