Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्या'त्या' व्हायरल व्हिडीओवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई | Mumbai

मराठा आरक्षणासंदर्भात राज्यस्तरीय बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेपूर्वीचा त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओवरून या तिघांनाही ट्रोल केलं जातं आहे. या व्हिडीओवर आता एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण दिले आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत म्हणाले आहेत की, मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद ‘सोशल मीडीया’वरून चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत, हे अतिशय निंदनीय आहे. आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून या घटकांनी जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये नेमका काय संवाद?

एकनाथ शिंदे – आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं.

अजित पवार – हो……येस

देवेंद्र फडणवीस – माईक चालू आहे.

मराठा आरक्षणाबाबत जी चर्चा झाली त्यानंतर पत्रकार परिषदेत भूमिका मांडण्याआधी हा संवाद झाला असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल केलं जातं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या