Saturday, September 21, 2024
Homeमुख्य बातम्याठाकरे गट-वंचितमधील युतीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

ठाकरे गट-वंचितमधील युतीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई | Mumbai

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी (Balasaheb Thackeray Birth anniversary) राज्यात नवीन राजकीय समीकरण अस्तित्वात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत चर्चा सुरू होती. त्या चर्चांना आज अखेर पूर्णविराम मिळाला असून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर आता या नव्या युतीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील काळा घोडा येथील पुतळ्यास पुष्पहार आणि अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आले होते. त्यावेळी याठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

त्यावेळी मुख्यमंत्री शिंदेंना शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीच्या नव्या युतीबाबत विचारण्यात आले असता ते म्हणाले की, ‘भीम शक्ती आणि शिव शक्ती एकत्र, प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा, असे म्हटले. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत ते म्हणाले की, बाळासाहेबांनी नेहमीच सर्वांना न्याय दिला. हे सरकार बाळासाहेबांच्या विचारावर आधारीत असून जनसामान्यांचे सरकार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या