Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्री शिंदेंची 'त्या' जाहिरातीवर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुख्यमंत्री शिंदेंची ‘त्या’ जाहिरातीवर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या (Shivsena) आज (मंगळवार, १३ जून) राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये ‘राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशा मथळ्याखाली पानभर जाहिराती छापून आल्या आहेत. या जाहिरातींमध्ये (Advertisements) महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय नेते असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यावर आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे…

- Advertisement -

Maharashtra Politics : फडणवीसांची लोकप्रियता घटली; शिंदे ठरले वरचढ

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आमचे सरकार हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात निधी दिला गेला. सर्वच प्रकल्प वेगवान सुरू आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेने मला आणि देवेंद्र फडणवीसांना पसंती दिली आहे. आम्ही जनतेचे आभारी आहोत, आमची जबाबदारी वाढली असून आणखी काम करु, असे त्यांनी सांगितले.

Nashik Accident News : तीन वाहनांचा विचित्र अपघात; चार जखमी

पुढे शिंदे म्हणाले की, पंतप्रधानाना देशानेच नाहीतर जगाने पसंती दिली आहे. ते जगात नंबर एकवर आहेत. अनेक मोठ्या देशांच्या अर्थव्यवस्था संकटात आहेत. पण भारताची अर्थव्यवस्था १० व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणण्याचे काम मोदींनी केले आहे. डबल इंजिन सरकारमुळे राज्याला खूप फायदा होत आहे. म्हणून मी देखील पंतप्रधानांचे अभिनंदन करतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

Samruddhi Highway Accident : अपघातांची मालिका सुरुच; दोन वेगवेगळ्या अपघातात २ ठार, ९ जखमी

तसेच शिवसेना-भाजप युती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर झालेली असून एक वैचारिक युती आहे. स्वर्थासाठी, सत्तेसाठी ही युती झालेली नाही. ही युती महाराष्ट्राच्या नागरिकांच्या मनातील युती आहे. ही युती येणाऱ्या विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्व निवडणुका लढेल आणि पूर्ण ताकदीने सर्व निवडणुका जिंकेल, असा दावाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या