Sunday, September 8, 2024
Homeमुख्य बातम्या“मराठा आरक्षणाचा ज्यांनी गळा घोटला तेच...”; CM शिंदेंचा विरोधकांवर घणाघात

“मराठा आरक्षणाचा ज्यांनी गळा घोटला तेच…”; CM शिंदेंचा विरोधकांवर घणाघात

बुलढाणा | Buldhana

जालन्यातील अंतरावली सराटी मराठा आंदोलकांवर शुक्रवारी (1 सप्टेंबर) पोलिसांनी लाठीचार्ज केला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी याठिकाणी आंदोलक चार दिवसांपासून उपोषण करत होते. पण त्याचवेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे मराठा समाज आक्रमक झाला. आता या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील अनेक जिल्ह्यांत आंदोलनं करण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जालन्यातील दुर्दैवी घटनेवर आपली भूमिका स्पष्ट करताना विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहेत. ते आज बुलढाणा जिल्ह्यात शासना आपल्या दारी या कार्यक्रमात बोलत होते.

- Advertisement -

जालन्यातील घटना दुर्दैवी आहे. ही घटना कशामुळे झाली, हे शोधण्यासाठी काही लोक येऊन गेले. ज्या लोकांनी आरक्षणाचा गळा घोटला तेच याठिकाणी गळा काढायला आले होते, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर घणाघात केला. अशोक चव्हाणजी, तुम्ही तर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष होता, तुम्ही मराठा आरक्षणासाठी काय केले ? आरक्षणासाठी तुम्ही काहीही केले नाही, याचा मी साक्षीदार आहे, असा आरोप मुख्यमंत्री शिंदेंनी केला आहे.

काही लोकं आंदोलनस्थळी येऊन गेले. पण, लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली. २०१७ मध्ये आमच्याच सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. पण, पुन्हा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये मराठ्यांचं आरक्षण रद्द झालं, असं शिंदे म्हणाले. मी शेतकऱ्याचा पुत्र आहे. गरीब शेतकऱ्याच्या घरात माझा जन्म झाला. मीही सर्वसामान्य एक मराठा आहे. माझ्या पोटात एक आणि ओठात एक असं नसतं. सरकार पडेल म्हणून नुसती चर्चा होते. आता अजित पवार देखील आमच्यासोबत आले. मुख्यमंत्री बदलणार म्हणून आता ओरड सुरु आहे. एका शेतकऱ्याच्या पुत्रामागे तुम्ही का लागला आहात? असा सवाल त्यांनी केला.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी 5 महत्त्वाच्या घोषणा केल्या. आंदोलकांवर लाठीमार केल्या प्रकरणी जालन्यातील पोलीस अधीक्षकाला आम्ही सक्तीच्या रजेवर पाठवले आहे, डीवायएसपीलाहा जिल्ह्यातून बाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत, अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) सक्सेना हे उद्याच जालना येथे येतील आणि दोषींना निलंबित केले जाईल, मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेची वेळ पडल्यास न्यायालयीन चौकशीही केली जाईल, आदी मोठ्या घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या