Friday, May 24, 2024
Homeमुख्य बातम्याअवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा; मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' निर्देश

अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा; मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश

मुंबई | Mumbai

राज्यभरात काल ठिकठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावल्याने अनेक जिल्ह्यांतील पिकांचे (Crop) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला असून सरकारने तात्काळ नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे…

- Advertisement -

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज सकाळी मुख्य सचिव व जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून राज्यातील नुकसानग्रस्त भागाची माहिती घेत शेतकऱ्यांना (Farmers) मदत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना (Collector) दिले आहेत.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

यावेळी माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हे सर्वसामान्यांचे सरकार (Government) असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे नाही. त्यामुळे हे सरकार संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. तसेच शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका असून महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे आणि पंचनामे करावेत, असे निर्देश दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.

धुलिवंदनच्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या, तुमच्या शहरातील इंधनाचे भाव

दरम्यान, दुसरीकडे हवामान खात्याने (Meteorological Department) महाराष्ट्राच्या विविध भागात ढगाळ वातावरण राहणार असल्याचे म्हटले असून ९ मार्चपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या