Friday, November 22, 2024
Homeनगरलाडकी बहीण योजनेत विरोधकांकडून खोडा

लाडकी बहीण योजनेत विरोधकांकडून खोडा

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

लाडकी बहिण योजनेत खोडा घालण्याचं काम महाआघाडीच्या लोकांनी केलं. त्यांना जनता धडा शिकवणार आहे. तालुक्यातील दंडेलशाही मोडीत काढण्यासाठी मी विठ्ठलराव लंघेंमागे खंबीरपणे उभा असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शिवसेना महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्यासाठी नेवासाफाटा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतली. ते म्हणाले, लाडकी बहिण योजनेत खोडा घालण्याचं काम महाआघाडीच्या लोकांनी केलं. लाडक्या बहिणीच्या खात्यात आलेले पैसे लवकर काढा अन्यथा पैसे परत जातील असा खोटा प्रचार केला. आमचं सरकार घेणारं नाही तर देणारं असल्याचं सांगत घेणारे देवांनाही सोडत नाही.

- Advertisement -

मालक तसे असतील तर त्यांचे आमदार कसे असतील आणि त्यांच्याविषयी मला जेवढी माहिती आहे तेवढी कोणाला असेल असे म्हणत उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता खोचक टोला लगावला. शनिदेव हे संपूर्ण देशाच श्रद्धास्थान असून तिथे देशातून लोक दर्शनाला येतात. तिथे मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार केला जातो. मात्र जर शनिदेवाची वक्रदृष्टी पडली तर रावाचा रंक होतो. तिथे होणारा भ्रष्टाचार खपवून घेणार नाही. तिथल्या भ्रष्टाचाराची चौकशी लावू म्हणत खरपूस घेतला तर आता शनिदेवच तालुक्यात परिवर्तन घडवून आणतील, असा विश्वास व्यक्त केला.

शेतकर्‍यांची कर्जमाफी ग्रामीण व शहरी भागाच्या विजबिलात 30 टक्के सुट, लाडकी बहिणीला दिड हजाराऐवजी 2100 रुपये तर शेतकर्‍यांना 12 हजाराऐवजी आता पंधरा हजार सन्मान निधी देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. इथल्या प्रस्थापितांनी सत्तेच्या माध्यमातून शेतकरी जनसामान्य ऐवजी स्वतःचाच विकास केला. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, शनि संस्थानमध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी करु. त्यासाठी आपल्याला तालुक्यात परिवर्तन करावे लागणार आहे, असे आवाहन त्यांनी केले. व्यासपीठावर प्रभाकर शिंदे, भाऊसाहेब चौधरी, सदाशिव लोखंडे, नितीन औताडे, अजित काळे, अब्दुल शेख, ऋषिकेश शेटे, सचिन देसर्डा, ज्ञानेश्वर पेचे, प्रताप चिंधे, अंकुश काळे, राजेंद्र मते, प्रदिप ढोकणे, नवनाथ साळुंके, दत्तात्रय पोटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व्यासपीठावर अगमन होताच मंडपाच्या बाहेर उन्हात बसलेल्या महिलांना पाहून पोलिसांकरवी सुरक्षा कठडे बाजूला करुन सर्व महिलांना व्यासपीठाच्या जवळ बसवून उपस्थितांची मने जिंकली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या