Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याठाकरे गटाला बसणार मोठा धक्का; मुख्यमंत्र्यांचे नीलम गोऱ्हेंना पत्र

ठाकरे गटाला बसणार मोठा धक्का; मुख्यमंत्र्यांचे नीलम गोऱ्हेंना पत्र

मुंबई | Mumbai

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला (Shinde Group) दिल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरूवात केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget Session) पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना धक्का देण्यासाठी नवी चाल खेळली आहे…

- Advertisement -

विधान परिषदेत (Legislative Council) शिवसेनेचा प्रतोद नेमण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांना पत्र दिले आहे. या पत्रात शिवसेना (Shivsena) विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विप्लव गोपीकिशन बाजोरिया (Viplav Gopikishan Bajoria) यांची प्रतोदपदी निवड करण्याचा ठराव झाल्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यासाठी शिंदेंकडून पहिला वार करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

उद्यापासून बदलणार ‘हे’ नियम; जाणून घ्या सविस्तर

दरम्यान, विधानपरिषदेत ठाकरे गटाचे (Thackeray Group) बहुमत असल्यामुळे प्रतोद नियुक्ती करून ताबा मिळवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असला तरी बहुमतापुढे काही होणार नाही, असे ठाकरे गटाने ठाम सांगितले आहे. तसेच प्रतोद नेमल्यानंतर पक्षाची अधिकृत भूमिका घेण्याचा मार्ग मोकळा होणार असून ठाकरे गटातील विधान परिषदेच्या आमदारांना (MLA) नव्या प्रतोदचा व्हीप मान्य करावा लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई देखील होऊ शकते.

मोठी बातमी! लोकलचे तीन डबे रुळावरून घसरले

- Advertisment -

ताज्या बातम्या