Friday, April 25, 2025
HomeराजकीयCM एकनाथ शिंदेंच्या संपत्तीत ५ वर्षात तिपटीने वाढ, एकूण संपत्ती किती?

CM एकनाथ शिंदेंच्या संपत्तीत ५ वर्षात तिपटीने वाढ, एकूण संपत्ती किती?

मुंबई । Mumbai

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी एकनाथ शिंदे यांनी संपत्तीची सविस्तर माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे. प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या संपत्तीत मागील पाच वर्षात तिपटीने वाढ झाली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञानुसार त्यांच्याकडे एकूण ३७ कोटी ६८ लाख ५८ हजार १५० रुपये इतकी संपत्ती आहे. त्यामध्ये जंगम मालमत्ता ९ कोटी २१ लाख ७८ हजार १५० तर, स्थावर मालमत्ता २८ कोटी ४६ लाख ८० हजार इतकी आहे. २०१९ मध्ये म्हणजेच पाच वर्षांपूर्वी त्यांच्याकडे १३ कोटी ६६ लाख ७४ हजार ९३२ इतकी मालमत्ता होती.

गेल्या पाच वर्षांत त्यांच्या मालमत्तेत २४ कोटी १ लाख ८३ हजार २१८ रुपयांची वाढ झाली आहे. तसेच ३७ कोटी ६८ लाख रुपयांच्या संपत्तीचे मालक असलेल्या शिंदे यांच्याकडे मात्र बोलेरो आणि आरमाडा ही दोन वाहने आहेत. त्यांनी आरमाडा हे वाहन २००६ मध्ये तर, बोलेरो हे वाहन २०११ मध्ये खरेदी केलेले आहे. तर, पत्नी लता यांच्या नावावर एक टेम्पो, दोन इनोव्हा, एक स्कार्पिओ हे वाहन आहे. शिंदे यांचे शिक्षण एमएपर्यंत झालेले आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपणार आहे. उद्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर आहे. राज्यात सर्व २८८ जागांसाठी एकाच टप्प्यात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघांतील निवडणुकीसाठी २८ ऑक्टोबरपर्यंत ३ हजार २५९ उमेदवारांचे ४ हजार ४२६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...