Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो झळकले थेट टाईम्स स्क्वेअरवर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो झळकले थेट टाईम्स स्क्वेअरवर

मुंबई | Mumbai

अमेरिकेच्या न्युयॉर्क (New York) शहरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde Photo) यांचे फोटो झळकले आहेत. न्युयॅार्कमधल्या टाईम स्क्वेअरवर (Times Square) एकनाथ शिंदे यांचा फोटो झळकला आहे. न्युयॅार्क शहरातील टाईम स्क्वेअरवर झळकणारे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील पहिले राजकारणी आहेत. दरम्यान, त्यांच्या फोटोवरून आता पुन्हा राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

- Advertisement -

न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फोटो झळकनारे ते पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्या सोबत श्रीकांत शिंदे आणि राहुल कनाल यांचे देखील फोटो या ठिकाणी झळकले आहेत. राहुल कनाल यांनी हा उपक्रम राबविला आहे.

Kishori Pednekar : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे न्युयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकणारे पहिले नेते ठरले आहेत. शिवसैनिकांकडून यावर आनंद व्यक्त करण्यात येत आहे. युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य तसेच शिर्डी देवस्थानचे विश्वस्त राहुल कनाल यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी कनाल यांचे शिवसेनेत स्वागत केले होते. याबाबत एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले होते. याच पक्षप्रवेशाचे फोटो टाईम्स स्क्वेअरवर झळकले आहेत.

मणिपुरात पुन्हा भडका! आक्रमक जमावाने शस्त्रागार फोडले; रायफल्स, काडतूसे घेऊन पोबारा

न्यू यॉर्क येथील टाइम्स स्क्वेअरहा जगप्रसिद्ध आहे. या अतिशय गजबजलेल्या असलेला हा चौक गजबजलेला असतो. या ठिकाणी झालेली अनेक आंदोलने देखील प्रसिद्ध आहे. अमेरिकेच्या सांस्कृतिक आणि आर्थिक महासत्तेचे हा चौक प्रतीक आहे. त्यामुळे या ठिकाणी फोटो झळकने ही मोठी बाब असते. अशा या चौकात फोटो लागणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या