आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाजपसोबत गेलो नाही तर मला तुरुंगात टाकतील, असे एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडत म्हणाले होते असे म्हणत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे….

धक्कादायक! भरधाव ट्रकने ८ जणांना चिरडलं

यावेळी ते म्हणाले की, आदित्य ठाकरे अजून लहान असून त्यांच्याकडे कुठे लक्ष देता, अश्या दोन शब्दात मुख्यमंत्र्यांनी (CM) प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांची तब्येत बरी नसल्याने आजचे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागणार? समोर आली ‘ही’ मोठी अपडेट

दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या दाव्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी हा दावा खरा असल्याचे स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे माझ्याकडेही आले होते आणि आघाडीतून बाहेर पडण्याची विनंती करत होते. मला अटकेची भीती वाटत आहे असे म्हणत होते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *