Tuesday, July 2, 2024
HomeनाशिकEknath Shinde : "मी त्यांना..."; लक्ष्मण हाकेंनी उपोषण स्थगित केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची...

Eknath Shinde : “मी त्यांना…”; लक्ष्मण हाकेंनी उपोषण स्थगित केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

नाशिक | Nashik

- Advertisement -

गेल्या दहा दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि नवनाथ वाघमारे यांचे जालन्यातील वडीग्रोदी येथे मराठा समाजाला (Maratha Community) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये,या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू होते. त्यानंतर आज मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सरकारच्या शिष्टमंडळाने उपोषणस्थळी जात त्यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर हाके आणि वाघमारे यांनी उपोषण स्थगित करत असल्याचे जाहीर केले.यानंतर आता हाकेंनी उपोषण स्थगित केल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे देखील वाचा : Nashik News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नाशकात आगमन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) होते. यावेळी त्यांना माध्यम प्रतिनिधींनी लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाबाबत प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की,”लक्ष्मण हाके यांनी शिष्टमंडळाचा मान ठेवत उपोषण मागे घेतले आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. काल शुक्रवारी यासंदर्भात बैठक झाली होती. या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्रीही उपस्थित होते. त्यावेळी विविध मुद्द्यावर बोलणे झाले.आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याबाबत चर्चा झाली. अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात यासंदर्भातील काही विषयांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचेही ठरले आहे. आज सरकारचे एक शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले होते.त्यामुळे हाके यांनी शिष्टमंडळाचा मान ठेवत उपोषण मागे घेतले आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Chhagan Bhujbal : “जमाना जानता हैं, हम किसीके बाप से भी…”; भुजबळांनी जरांगेंना ललकारलं

दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, “लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांना मी भेटले होते. त्यांच्या तब्येतीची चौकशी मी वेळोवेळी करत होते. काल आमची बैठक झाली. बैठकीत आम्ही आमचे विचार मांडले. शिष्टमंडळाला आज पाठवण्यात आले. चांगली गोष्ट आहे की, सरकारने दखल घेतली. सरकारकडून सकारात्मक निर्णय येईल. या विषयाने आंदोलन स्थगित केले असेल” असे त्यांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या