Tuesday, September 17, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्री शिंदेंचे उद्धव ठाकरेंना 'त्या' टीकेवरून प्रत्युत्तर; म्हणाले, "त्यांनी बांद्रा ते बांधा…"

मुख्यमंत्री शिंदेंचे उद्धव ठाकरेंना ‘त्या’ टीकेवरून प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांनी बांद्रा ते बांधा…”

मुंबई | Mumbai

- Advertisement -

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. महायुती सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असून ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवन परिसरात वेगवेगळ्या घटना घडल्याचे पाहायला मिळाले आहे. यात राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची विधानभवनात भेट झाली. त्यानंतर दोघांनीही एकाच लिफ्टमधून प्रवास केला.जवळपास दोघांनी तीन मिनिटे सोबत प्रवास केला. याशिवाय भाजपचे नेते आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील उद्धव ठाकरेंची भेट घेतली.यावेळी दोघांमध्ये हास्यविनोद झाला. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना चॉकलेट दिले. त्यामुळे आजचा पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस विविध घडामोडींनी ढवळून निघाला.

हे देखील वाचा : विधानभवनात उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांचा एकाच लिफ्टने प्रवास; काय झाली चर्चा?

यानंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दुपारी एक वाजेच्या सुमारास पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह विविध मुद्द्यांवर भाष्य करत राज्य सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) जोरदार निशाणा साधला होता. त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी माध्यमांशी बोलतांना ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “काही लोक बोलत आहेत. काही लोक आनंद व्यक्त करत आहेत. भाजपने २४० जागा जिंकल्या. त्याच्या सर्वांच्या मिळून तितक्या जागा आल्या नाहीत. काही लोक छाती फुगवून येणारे पाहतोय. देशात खोटे नरेटिव्ह पसरवले. संविधान (Constitution) बदलणार साऱख्या खोट्या बातम्या पसरवूनही मोदी सत्तास्थानी पोहोचले,असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

हे देखील वाचा : “मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करा”; उद्धव ठाकरेंचे नाव घेत संजय राऊतांचे मोठे विधान

पुढे ठाकरे-फडणवीस यांच्या लिफ्टमधील भेटीवर बोलतांना शिंदे म्हणाले की, “कुणी कितीही लिफ्ट मागितली तर ती सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, आणि ते (ठाकरे) काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेल्याने आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये आलो. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केले. त्यामुळे ठाकरे फडणवीस यांच्यासोबत लिफ्टमध्ये गेल्याने युतीत येणार आहे असे होत नाही”, असे शिंदेंनी म्हटले. तसेच नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले म्हणून काही लोक पेढे वाटत आहेत, असा चिमटाही शिंदेंनी यावेळी ठाकरेंना काढला.

हे देखील वाचा : अजित पवारांकडून राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर

तसेच मुख्यमंत्री पंचतारांकीत शेती करतात, अमावस्या-पौर्णिमेला वेगळं काहीतरी पिक काढतात, अशी टीकाही ठाकरेंनी शिंदेवर केली होती. या टीकेवर बोलतांना शिंदे म्हणाले की, लंडनमधल्या पंचतारांकीत हॉटेलपेक्षा पंचतारांकीत शेती बरी नाही का? शेतकऱ्यांनी चांगली पिके घेऊ नयेत का? त्यांच्या डोक्यात अमावस्या पौर्णिमा, लिंबू, मिरचावाले आहेत. तसेच लेक लाडकी केलं, लाडका भाऊ पण करू, पण बोलणाऱ्यांचे भाऊ कुठे आहेत? असा टोला देखील शिंदेंनी ठाकरेंना लगावला.

हे देखील वाचा : भाजप नेत्यांसोबत चर्चा करतांना एकनाथ खडसेंची खदखद; म्हणाले, “मागून येणाऱ्यांना आधी…”

त्यासोबतच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन आणि कर्जमाफीवरून ठाकरेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देतांना शिंदे म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारे आम्ही आहोत. त्यांनी बांद्रा ते बांधा कधी पाहिले नाही. त्यांना शेतकऱ्यांचे दु:ख कसे कळणार? त्यासाठी शेतात जावे लागते,चिखल तुडवावा लागतो. घरात बसून कसे कळणार आहे. शेतीच्या बाबतीत वर्क फ्रॉम होम चालत नाही. तिथे वर्क फ्रॉम फिल्ड चालते,अशी टीका देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंवर केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या