Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्याभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे सामान्य माणूस मुख्यमंत्री झाला - शिंदे

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे सामान्य माणूस मुख्यमंत्री झाला – शिंदे

मुंबई | Mumbai

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी मुंबईतील चैत्यभूमीवर (Chaityabhumi) जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन केले…

- Advertisement -

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जगाला दिशा देण्याचे काम केले आहे. संविधानामुळेच माझ्यासारखा सामान्य कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री झाला. तसेच समाजातील सर्व घटकांना समान हक्क आणि न्याय मिळावा हीच बाबासाहेबांची भावना होती. सरकार त्यांच्या विचारावरच चालतं आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले की, आमच्या सरकारमध्ये इंदू मिलचे स्मारक (Indu Mill Monument) लवकरात लवकर पूर्ण होईल. आम्ही कामाची पाहणी करून आढावा घेतला आहे. तसेच आमचं सरकार बाबासाहेबांच्या मार्गावर वाटचाल करेल, असा निर्धार केला आहे. राजगृह हा आपला ऐतिहासिक ठेवा असून तो जोपासला जाईल. लोअर परेल येथील स्मारकाची पाहणी केली जाईल, बाबासाहेबांच्या आठवणी जपण्याचे काम केले जाईल, असेही शिंदे म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, आंबेडकरांनी देशाला, समाजाला दिशा दिली. त्यांनी दुर्बलांना सशक्त करण्याचे काम केले. सामान्य माणूस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. मानवमुक्ती हेच त्याचे धेय्य होते. त्यांनी भारतातीलच नव्हे तर जगभरातील वंचितांच्या हक्कांना, मानवी प्रतिष्ठेला वैचारिक आणि संघटनात्मक बळ दिले. दलित समाजात रुजलेली न्यूनगंडाची भावान काढून टाकली. त्यांनी संघटित होण्यास बळ दिले. शिका संघटित व्हा, असा मूलमंत्र त्यांनी दिला, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या