Saturday, September 21, 2024
Homeमुख्य बातम्याVIDEO : “सल्ल्याची गरज असली की मी शरद पवारांना...”; मुख्यमंत्री शिंदेंनी बरंच...

VIDEO : “सल्ल्याची गरज असली की मी शरद पवारांना…”; मुख्यमंत्री शिंदेंनी बरंच काही सांगितलं

पुणे (प्रतिनिधी)

- Advertisement -

“कुणीही काही म्हणू देत, पवार साहेब नेहमी सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात, त्यांचे योगदान खूप मोठे आहे. सहकार क्षेत्रात शरद पवार यांचा शब्द अंतिम मानला जातो, मला ज्यावेळी सल्ल्याची गरज असते. त्यावेळी मी शरद पवारांना फोन करतो. ते नेहमी चांगले सल्ले देतात,” अशी स्तुतीसुमने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्याबाबत उधळली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली त्यावेळी शिंदे बोलत होते.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवार यांचे तोंडभरुन कौतुक केले.

ते पुढे म्हणाले, “शरद पवार सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात. ते अनुभवी नेते आहेत. त्यांनी आजपर्यंत विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यामुळेच कुठला माणूस सत्तेवर बसलाय, हे न पाहाता या राज्याच्या हितासाठी ते नेहमीच मार्गदर्शन करतात. मलाही ते आवश्यकता असेल तेव्हा फोन करतात, सूचना करतात, मार्गदर्शनही करतात. मी त्यांचा मनापासून आभारी आहे”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या