Monday, November 25, 2024
Homeब्रेकिंग न्यूजगणेशांचे अखंड कृपाछत्र महाराष्ट्रावर राहावे…; मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

गणेशांचे अखंड कृपाछत्र महाराष्ट्रावर राहावे…; मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

मुंबई | Mumbai
श्री गणेश आगमनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील नागरिकांसह, जगभरातील तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्री गणेशांचे अखंड कृपाछत्र महाराष्ट्रावर राहावे, अशी मनोकामनाही मुख्यमंत्र्यांनी बाप्पा चरणी केली आहे.

‘राज्यातल्या सर्व नागरिकांना, गणेश भक्तांना श्री गणेशाच्या आगमनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. गणरायाचे आगमन झालेय.आपल्या आयुष्यात पण आनंद, समाधान, समृद्धी येवो. सर्वांना सुबुद्धी मिळो हीच प्रार्थना’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

श्री गणेशाचे आगमन दरवर्षी एक नवी ऊर्जा, प्रेरणा आणि उत्साह घेऊन येते. यातून मंगलमय, पवित्र वातावरण निर्माण होते. गणेशोत्सवातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडते. म्हणून जगाचेही महाराष्ट्राकडे लक्ष लागलेले असते. श्री गणेशाला कलाधिपती मानले जाते. त्यामुळे या उत्सव काळात कलाविष्कारालाही उधाण येते. महाराष्ट्राचा काना कोपरा अशा अविष्कारांनी, उत्साह-जोश यांनी ओसंडून जातो. यंदाही आपण हा उत्सव उत्साहात, जल्लोषात आणि पावित्र्य राखून साजरा करूया. श्री गणेशाची मनोभावे सेवा करतानाच, आपण सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवूया. उत्सव ही संधी मानून आपण समाजातील गरजूंपर्यंत पोहचून, त्यांच्यापर्यंत शिक्षण, आरोग्य तसेच अशा विविध प्रकारच्या सेवा, मदत पोहचवण्याचा प्रयत्न करूया.

सामाजिक आणि धार्मिक सलोखा हा महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. त्यामुळे हे प्रेम – आदर आणखी वाढीस लागेल, असे प्रयत्न करु या. आपला महाराष्ट्र भारताचं ग्रोथ इंजिन आहेच. वेगवेगळ्या आघाडयांवर आपण वेगाने काम करीत आहोत. देशाच्या विकासात महाराष्ट्राची मोठी भूमिका आणि योगदान असते. अनेक चांगल्या समाजिक योजना आपण सुरु केल्या आहेत, देशपातळीवर त्याचं कौतुक होतेय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारखी योजना म्हणजे राज्यातल्या भगिनींच्या आयुष्यात क्रांती आणणारी योजना ठरत आहे. या बहिणींचे आशीर्वादही आम्हाला मिळत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या