Thursday, June 20, 2024
Homeमुख्य बातम्याएकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले...

एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले…

मुंबई | Mumbai

- Advertisement -

मुंब्रा इथे असणाऱ्या शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेचे (Mumbra Shivsena Shakah) कार्यालय शिंदे गटाने (Shivsena Shinde Group) जमीनदोस्त केले. या कार्यालयाची पुनर्बांधणी केली जाणार आहे. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Uddhav Thackeray Group) यांनी शनिवारी त्या शाखेला भेट देण्यात मुंब्र्यात आ ले होते. दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष नरेश मस्के आणि कार्यकर्ते शाखा परिसरात तळ ठोकून बसले होते. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांनी उद्धव ठाकरेंना शाखेत जाण्यापासून रोखले.

दरम्यान, या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवरुन ठाकरे गटाला लक्ष केले आहे. ते म्हणाले, “मुंब्र्यात एवढे फटाके वाजले की काहींना युटर्न घेऊन परत जावे लागले,” अशी टीका एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. ते ठाण्यात एका कार्यक्रमात बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले, “मुंब्र्यात काही फुसके बार येऊन गेले. पण, ते वाजलेच नाही. नरेश मस्के आणि कार्यकर्त्यांनी एवढे फटाके वाजवले की युटर्न घेऊन परत जावे लागले. ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. जे पेरले तेच उगवले.”

उध्दव ठाकरे काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी स्टेजवरून भाषण करत म्हटलं होतं की, बॅरीकेटपलिकडे सर्व भाड्याने आणलेली तट्टू होती. मी लढण्यासाठी मैदानात आलोय. आमचे पोस्टर फाडले पण निवडणुकीत यांची मस्ती फाडल्याशिवाय राहणार नाही. बुलडोझरने शाखा पाडली. पण, खरा काय बुलढोझर असतो तो मुंब्र्याच्या रस्त्यावर पाहिला असेल. तुम्ही मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारला आहे. त्यामुळे याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही ठाकरे यांनी दिला.

“राज्यातील सरकारने पोलिसांना आधी वारकऱ्यांवर, त्यानंतर मराठा आंदोलकांवर हल्ला करायला लावला आणि आता मुंब्य्रात शाखाचोरांचे संरक्षण करायला लावले आहे. मी राज्यातील पोलिसांना दोष देत नसून ते हतबल आहेत, अशी टीका त्यांनी केली. खोके सरकारने आमची शाखा पाडून एक खोका अडकवून ठेवला आहे. आमच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. तो खोका लवकरात लवकर उचलावा. अन्यथा आम्ही येऊन तो खोका उचलून फेकून देऊ. तुमच्या हिंमत असेल, तर पोलिसांना बाजूला सारून समोर या,” असे आव्हानही उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या