अहिल्यानगर । प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जन्मगाव चौंडी येथे आज राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चौंडी गावासाठी 681 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला. तसेच अष्टविनायक गणपती मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी 147 कोटी, श्री तुळजापूर भवानी मंदिरासाठी 865 कोटी, ज्योतिबा मंदिरासाठी 259 कोटी, त्र्यंबकेश्वरसाठी 275 कोटी, श्री महालक्ष्मी मंदिरासाठी 1445 कोटी, आणि माहूर गड विकासासाठी 829 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. एकूण 5503 कोटी रुपयांचे प्रकल्प मान्य करण्यात आले आहेत.
धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘यशवंत विद्यार्थी योजना’ सुरू होणार असून 10 हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमात शिक्षण मिळणार आहे. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृहांची उभारणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिल्यानगरमध्ये वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणाही यावेळी केली.