मुंबई:
शॉर्टकट मारले की रात्रीची कामे करावी लागतात. आमच्यावर मात्र तशी वेळ कधी आली नाही. आम्ही दिवसाढवळ्या कामे करतो. हो ना अजितदादा’, असे विधान करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली.
विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाची सांगता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणाने झाली. उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईत जन्मलेली पहिली व्यक्ती महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभली हे मी माझे भाग्य समजतो. मुंबईकरांसाठी आपण अनेक गोष्टी आणणार असून जनसंपत्तीसह वनसंपत्तीही महत्त्वाची आहे. आरचे पैसा वाया जाऊ देणार नाही. काम करताना अहंकार असता नये. अन्यथा रात्रीच्या अंधारात झाडे कापावी लागतात, असे त्यांनी फडणवीस यांना टोला मारला. तसेच ओरडून बोलल्यामुळे करोना होतो, असा टोलाही विरोधी बाकांवर कटाक्ष टाकत मुख्यमंत्र्यांनी लगावला.