Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्यारणरागिणीला मुख्यमंत्र्यांचा फोन, म्हणाले...

रणरागिणीला मुख्यमंत्र्यांचा फोन, म्हणाले…

मुंबई / प्रतिनिधी
ताई, तुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दात करू…तुम्ही चिंता करू नका लवकर बरे व्हा, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना दिल्या.

बॉलीवूड अभिनेत्यांच्या बॉडीगार्डचे पगार ऐकून थक्क व्हाल ?

- Advertisement -

तुमच्यावर हल्ला करणाऱ्याला कठोर शासन केले जाईल. तुम्ही चिंता करू नका. फक्त लवकरात लवकर बरे व्हा, सरकार आपल्या पाठीशी आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करताना पिंपळे यांच्यावर हल्ला झाला होता. त्या सध्या रुग्णालयात उपचार घेत असून उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तुमच्या प्रकृतीची मी रोज माहिती घेत असतो. काळजी करू नका ठणठणीत बरे व्हा, असेही ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्याकडून पिंपळे यांच्या प्रकृती बाबत माहिती घेत असतात. आज त्यांनी महापौरांच्या मोबाईलवरून पिंपळे यांच्याशी संवाद साधला. यावेळी महापालिका आयुक्त विपीन शर्मा उपस्थित होते. पिंपळे यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेतला जाईल, असेही ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या