Saturday, May 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलाविली सर्वपक्षीय बैठक; 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलाविली सर्वपक्षीय बैठक; ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

मुंबई | Mumbai

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण (OBC political reservation) रद्द केले आहे. त्यामुळे नवा राजकीय व सामाजिक पेच निर्माण झाला आहे.

- Advertisement -

पुढील वर्षात राज्यात मुंबईसह १८ महानगरपालिका, अनेक नगरपालिका, २५ जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न पुढे येणार आहे. त्यावर कसा मार्ग काढायचा, यावर विचार विनिमय करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या (CM Uddhav Thackarey) अध्यक्षतेखील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह 27 नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. यात ओबीसी आणि मराठा नेत्यांचाही समावेश आहे. दरम्यान या बैठकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अनुपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या