Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद, म्हणाले...

मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद, म्हणाले…

मुंबई | Mumbai

तब्बल दीड वर्षानंतर आज राज्यातील (Schools Reopen) शाळा सुरू झाल्या आहेत. करोना बाबतचे सर्व नियम पाळून शहरातील ८ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यास परवानगी दिली आहे. शाळा सुरू झाल्याने शिक्षकांतही आनंदाचे वातावरण असून आता शाळांत बच्चेकंपनीचा किलबिलाट पुन्हा ऐकायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला.

- Advertisement -

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, पुन्हा शाळेची घंटा वाजली आहे. मला आज माझ्या शाळेचे दिवस आठवत आहेत. आजच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात कठिण आणि आव्हानात्मक काळ आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील कठीण काळ सुरु आहे. शाळा सुरु करण्याचा निर्णय खुप अवघड होता. शाळेचं नाही तर आपल्या भविष्याचं दार उघडलं आहे, हे उघडतांना खुप काळजीपुर्वक निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यानी शिक्षकांना आणि वडिलांना आपल्या मुलांची जबादरी घेण्याची विनंती केली.

तसेच, शिक्षकांना कधीही आरोग्याबाबत शंका आली तर त्यांनी करोना चाचणी करणे गरजेचं आहे. विद्यार्थ्यांकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. ऋतू बदलत असतांना साथीचे रोग येत असतात. त्यामुळे या दरम्यान करोना तर आला नाही ना, याची खात्री करुन घेणे महत्वाचे आहे. तसेच शिक्षकांनी काळजी घ्यावी की शिक्षणाची जागा, वर्ग बंदिस्त नसायला हवे, ते उघडे असायला हवे. दार, खिडक्या उघड्या असायला हव्या, जशे हसते खेळते मुलं तशी खेळती हवा वर्गात राहायला हवी. तसेच सोशल डिस्टंगिंचे पालन करणे, स्वच्छता राखणे महत्वाचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या