Tuesday, October 22, 2024
Homeनगरजिल्ह्यातील 500 सहकारी संस्थांच्या निवडणुका आता पुढील वर्षी

जिल्ह्यातील 500 सहकारी संस्थांच्या निवडणुका आता पुढील वर्षी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा 31 डिसेंबरपर्यंत पुढ ढकलण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे नगर जिल्ह्यात सध्या 450 ते 500 सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. यातील क आणि ड वर्गातील निवडणुका गेल्या सात ते आठ महिन्यांपासून रखडलेल्या आहेत. प्रारूप मतदार यादी कार्यक्रमापर्यंत प्रक्रिया झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तयारीमुळे जानेवारी, फेबु्रवारीपासून या निवडणूक जागेवर थांबवण्यात आल्या होत्या.

- Advertisement -

मात्र, मागील आठवड्यात सहकार निवडणूक प्राधिकारणाकडून निवडणुकीसाठी हिरवा कंदील होणार असल्याने या येत दाखवण्यात 1 ऑक्टोबर निवडणूक प्रक्रिया राबवण्यास सांगण्यात आले. मात्र, आता सहकार विभागाच्या सर्व निवडणूका आता पुढील वर्षी 2025 होणार असून 31 डिसेंबरपर्यंत सर्व निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यात राज्यात अ वर्गाच्या 42, ब वर्गाच्या 1 हजार 716, क वर्गाच्या 12 हजार 250 आणि ड वर्गाच्या 15 हजार 435 संस्थांच्या निवडणुका होणे बाकी आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या