Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमातोश्री निवासस्थानी आढळला विषारी 'कोब्रा'; सर्पमित्रांनी यशस्वी केले रेस्क्यू

मातोश्री निवासस्थानी आढळला विषारी ‘कोब्रा’; सर्पमित्रांनी यशस्वी केले रेस्क्यू

मुंबई | Mumbai

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वांद्रे येथील बंगल्यात विषारी साप आढळल्याने एकच खळबळ उडाली. बंगल्याच्या आवारात पार्किंगमध्ये कोब्रा (Cobara Snake In Matoshri) जातीचा विषारी साप आढळला. यानंतर त्वरीत सर्प मित्रांना बोलवण्यात आले. या सापाला रेस्क्यू (Snake Rescued Safely) करून त्याला जंगलात सोडण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्प मित्रांचे आभार मानले.

- Advertisement -

रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास वांद्रे पूर्व येथील कलानगरच्या मातोश्री बंगल्यामधून वाईल्ड लाईफ अॅनिमल प्रोटेक्शन ऍण्ड रेस्क्यू असोसिएशन संस्थेला फोन आला. आमच्या बंगल्याच्या आवारात साप फिरत असल्यामुळे सर्पमित्रांची मदत हवी आहे, असे फोनकरुन सांगण्यात आले असता सर्पमित्र अतुल कांबळे हे मातोश्री निवासस्थानी आले. त्यांनी हा साप कोब्रा असून विषारी जातीचा नाग असल्याचे सांगितले. या नागाची लांबी अंदाजे ४ फुट होती.

त्या हद्दीतील अधिकारी रोशन शिंदे यांना फोन करून ही माहिती कळवली. हा नाग हा पूर्णपणे व्यवस्थित आहे. त्यामुळे त्याला वनविभागाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे जंगलात सोडण्यात आले, अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी रेस्क्यू ऑपरेशन झाल्यानंतर सर्पमित्रांची भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले. सर्पमित्रांनी पकडलेला हा नाग ठाकरे कुटुंबाला दाखवण्यात आला, तेव्हा तिथे उद्धव ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या