Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCold Weather Update : पुढील १२ दिवस थंडीचा कडाका; उत्तर महाराष्ट्र-विदर्भात थंडीची...

Cold Weather Update : पुढील १२ दिवस थंडीचा कडाका; उत्तर महाराष्ट्र-विदर्भात थंडीची लाट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) ‘सेन-यार’ आणि ‘दिट-वाह’ ही दोन चक्रिवादळे तयार झाल्यानंतरही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्राला (Maharashtra) अपेक्षेपेक्षा जास्त थंडीचा अनुभव आला. आता मात्र, पुढील १२ दिवस (२० डिसेंबर) मार्गशीर्ष दर्श अमावास्या पर्यंत राज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.

- Advertisement -

उत्तर महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत रात्री थंडीची (Cold) लाट तर दिवसा थंड दिवसांची स्थिती राहण्याची शक्यता आहे. मुंबई-कोकण विभाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात हूडहूडी भरण्याचे दिवस येत आहेत. हवामानप्रेमी आणि अभ्यासक या स्थितीला ‘डिसेंबरची असामान्य थंडीची लाट’ म्हणत आहेत. शेतकरी, पशुपालक आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पुढील १२ दिवसांचा अंदा

उत्तर महाराष्ट्रात रात्रीचे तापमान ६ ते १० अंश सेल्सीअसपर्यंत घसरण्याची शक्यता.दिवसाचे कमाल तापमान २४-२७ अंश सेल्सीअसच्या आसपास; थंड दिवसांची शक्यता. मराठवाडा-विदर्भात रात्री ७-११ अंश सेल्सीअस, दिवसा २५-२८ अंश सेल्सीअस, मुंबई-कोकणात पहाटेचे तापमान १७-२० अंश सेल्सीअसच्या आसपास सामान्य थंडी.

थंडी वाढण्याची प्रमुख कारणे

उत्तर भारतातून येणारे ईशान्येकडे वळून महाराष्ट्रात थेट प्रवेश करत आहेत. दक्षिणेकडील हंगामी मान्सूनचा प्रभाव कमी झाल्याने थंड हवेच्या प्रवाहाला अडथळा नाही. पश्चिमी क्षोभ एकापाठोपाठ येत असल्याने उत्तर भारतातून सतत थंड वारे दाखल होत आहेत.जेट स्ट्रीमचा पट्टा ३९ अंश सेल्सीअस उत्तर ते २२अंश सेल्सीअस उत्तर अक्षवृत्तापर्यंत दक्षिणेकडे रुंदावला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...