Friday, November 15, 2024
HomeनाशिकNashik News : 'त्या' मारहाणीची सखोल चौकशी करा - जिल्हाधिकारी

Nashik News : ‘त्या’ मारहाणीची सखोल चौकशी करा – जिल्हाधिकारी

पोलीस, तहसीलदारासमवेत केली पाहणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकचे जागृत देवस्थान म्हणून मान्यता असलेल्या त्र्यंबकराज्याच्या दर्शन घेणाऱ्या वृध्द भाविकांना सुरक्षारक्षकाने मारहाण (Beating) केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी गंभीर दखल घेतली असून, याबाबत माहिती घेण्यासाठी सोमवारी (दि.१७) त्यांनी त्र्यंबकेश्वरला प्रत्यक्ष भेट देऊन प्रकरणाची माहिती घेत पोलिसांना व तहसीलदारांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी सलग तीन दिवस शासकीय सुट्टी असल्यामुळे भाविकांची (Devotees) गर्दी बाढली आहे. नाशिकचे महेंद्र सूर्यवंशी हे रविवारी (दि.१६) आपल्या आई वडिलांसह त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) दर्शनासाठी गेले होते. दर्शन करत असताना सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर काढण्याची घाई केली. त्यावेळी महेंद्र यांची सुरक्षारक्षकांसोबत बाचाबाची झाली. यातून सुरक्षारक्षकांनी अर्वाच्य भाषा वापरुन मारहाण केल्याचा आरोप सूर्यवंशी यांनी केला आहे.

हे देखील वाचा : Nashik News : चार तालुक्यांत पावसाची दमदार हजेरी; १३ गावे, २१ वाड्यांचे टँकर बंद

याप्रकरणी जिल्हाधिकारी शर्मा यांनी सोमवारी त्र्यंबकेश्वरला भेट देत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.याशिवाय दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.तसेच भाविकांचे वेळेत दर्शन होईल आणि योग्य सुविधा प्रशासन त्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

दरम्यान, मंदिर विश्वस्तांकडूनही या प्रकरणाचा खुलासा करण्यात आला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्र्यंबकेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने सुरक्षारक्षकांनी (Security Guards) संबंधित भाविकांना पुढे जाण्यास सांगितले. मात्र, संबंधित भाविकांनी चार धामचे तीर्थ चढवण्यासाठी आग्रह धरला. त्यात वयोवृद्ध महिलेचा पाय अडकून ती पडली.यातूनच वाद निर्माण झाला असून, या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे मंदिर समितीचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी म्हटले आहे.

सिंहस्थासह संत निवृत्तिनाथ वारीचाही आढावा

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी त्र्यंबकेश्वरला भेट दिल्यानंतर सिंहस्थ कुंभमेळा व संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचाही आढावा जाणून घेतला. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासनासमवेत त्यांनी बैठक घेतली. या बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या सूचना प्रशासन आणि त्र्यंबकेश्वर ट्रस्टला देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या