Sunday, December 15, 2024
Homeनगरकलेक्टर कचेरीत आता कागदी टपालाला नो-एन्ट्री

कलेक्टर कचेरीत आता कागदी टपालाला नो-एन्ट्री

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शासन दरबारी सर्वसामान्य व्यक्तींच्या कामांना वेग यावा, ते जलदगतीने पूर्ण होऊन कामांमध्ये गतिमानता येण्यासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने आता जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांना विविध आदेश, कार्यालयीन कामकाज, यासाठी ई-ऑफिस प्रणाली सक्तीची केली आहे. यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयात कागदी टपालाला नो एन्ट्री करण्यात आली असून जिल्हा प्रशासनाकडे सर्व कामे, आदेश, कार्यालयीन टपाल आता ई-मेलव्दारे करावे लागणार आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने काम आता हायफाय होणार असून कामात गतिमानता येणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, सध्या जिल्हा महसूल विभाग वगळता अन्य शासकीय विभागांनी या ई-ऑफिस प्रणालीकडे कानडोळा केला असून यामुळे जिल्हा प्रशासनाने आता त्यांना ई-ऑफिस प्रणालीसाठी डेडलाईन दिली असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आता अन्य शासकीय कार्यालयांतील टपाल जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारले जाणार नसून त्यांना ई- ऑफीस प्रणालीचाच वापर करावा लागणार आहे. जिल्ह्यात ई- ऑफिस प्रणालीचा वापर करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी संबंधित विभागांना 15 दिवसांचा अल्टीमेटम दिला होता.

त्याची मुदत 13 ऑक्टोबर रोजी संपली असून आजपासून सर्व शासकीय विभागांना ई- ऑफिस प्रणालीचा वापर बंधनकारक होणार आहे. जिल्ह्यामध्ये ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करून त्याचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी सात प्रांत कार्यालये, तसेच 14 तहसील कार्यालयांतील उपलब्ध संगणकीय साहित्याचे जिल्हा प्रशासनामार्फत सर्व्हेक्षण करण्यात आले होते. ही प्रणाली अत्यंत वेगवान पद्धतीने राबविण्यासाठी सर्व कार्यालयास साधन सामग्रीची आवश्यकता भासणार त्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर, युपीएस यासह आवश्यक साधने खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 4 कोटी 41 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे.

मात्र, महसूल विभाग सोडता ई- ऑफिस प्रणालीचा वापर अन्य विभागाकडून होत नसल्याने निवासी उपजिल्हाधिकारी पाटील यांच्या आदेशानुसार अन्य शसकीय विभागातील कागदी टपाल अर्ज हे फक्त 13 ऑक्टोबरपर्यंत स्विकारले जातील असे आदेश काढण्यात आले होते. त्याची मुदत आता संपली असून या पुढे आता जिल्हा प्रशासनासोबत अन्य विभागांना आता ई- ऑफिस प्रणालीव्दारे संपर्क साधता येणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या