Saturday, June 15, 2024
Homeनगरकॉलेजची फी भरण्यासाठी ठेवलेल्या 32 हजारांची चोरी

कॉलेजची फी भरण्यासाठी ठेवलेल्या 32 हजारांची चोरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

कॉलेजची फी भरण्यासाठी घरात ठेवलेले 32 हजार 600 रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चोरून नेली आहे. सावेडी नाका येथील जयदीप मेडिकल जवळील आदित्य डी अपार्टमेंटमध्ये मंगळवारी (दि. 26) दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निशांत संजय एडके (वय 21 रा. सावेडी नाका) यांनी फिर्याद दिली आहे. ते टीवाय बीएससीचे शिक्षण घेतात. त्यांनी कॉलेजची फी भरण्यासाठी 32 हजार 600 रुपये घरातील टेबलच्या ड्राव्हरमध्ये ठेवले होते. मंगळवारी दुपारी साडे बारा वाजता ते घराला कुलूप लावून हेल्थ पॉलिसी काढण्यासाठी बाहेर गेले होते. त्यांचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते.

दरम्यान, निशांत दुपारी दोन वाजता घरी आले असता त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी पाहणी केली असता घरात ठेवलेली 32 हजार 600 रुपये चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी वडिलांना घडलेला प्रकार सांगितला व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या