धुळे – प्रतिनिधी dhule
शहरातील कॉलेज (College) तरुणीने नकाणे तलावात उडी घेत आत्महत्या (suicide) केल्याची घटना आज सकाळी घडली. ती कॉलेजला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र त्यानंतर तिचा नकाणे तलावात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.
चेतना पुरूषोत्तम पाटील (वय 22 रा.प्लॉट नं.18 यशोधन कॉलनी, वलवाडी, देवपूर) असे मयत तरूणीचे नाव आहे. ती आज सकाळी पावणे 7 वाजेच्या सुमारास घरी कॉलेजला जात असल्याचे सांगून दुचाकीने (क्र.एमएच 18 बीव्ही 6922) घरून निघाली होती.
सकाळी 9 वाजता तिच्या आजोबा काशिनाथ काकुळदे माहिती मिळाली की, तुमची दुचाकी ही नकाणे तलावाजवळ उभी असून तलावात एका मुलीचा मृतदेह तरंगत असल्याचे सांगितले. माहिती मिळताच त्यांनी कुटूंबियांसह घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा मुलगी ही त्यांची नात चेतना असल्याचे त्यांनी सांगितले.
तिने आत्महत्या का केली याचे कारण समजु शकलेले नाही. मात्र याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. याबाबत काशिनाथ खंडू काकुळदे (वय 74) यांनी पोलिसात खबर दिली आहे.