Thursday, July 23, 2026
Homeक्राईमCrime News : कॉलेज युवतीचा पाठलाग करणार्‍या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Crime News : कॉलेज युवतीचा पाठलाग करणार्‍या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

कॉलेजला जाताना आणि घरी येताना एका युवतीचा सतत पाठलाग करून तिला त्रास देणार्‍या एका तरुणाविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर संजय टोकेकर (रा. केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. सावेडी उपनगरात राहणार्‍या पीडित युवतीने फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

पीडित युवती शहरातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. कॉलेजमध्ये शिकणारा सागर टोकेकर हा गेल्या काही दिवसांपासून या युवतीवर पाळत ठेवत होता. पीडितेने त्याला अनेकदा बजावून देखील त्याने तिचा पाठलाग करणे थांबवले नाही. डिसेंबर महिन्यापासून संशयित आरोपीने युवतीच्या घरासमोर मोटारसायकलवरून येऊन तिला हातवारे करणे आणि तिचा पाठलाग करणे सुरूच ठेवले होते.

24 जानेवारी रोजी दुपारी संशयित आरोपी पुन्हा युवतीच्या घरासमोर आला आणि त्याने तिला आवाज देऊन त्रास देण्याचा प्रयत्न केला. या सततच्या त्रासामुळे आणि छेडछाडीमुळे पीडित युवतीने अखेर धाडस दाखवून तोफखाना पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी सागर टोकेकर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार गोसावी करत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Rain News : गोदावरी नदी काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी –...

0
नाशिक | Nashik गंगापूर धरण व परिसरात कालपासून पाऊस (Rain) सुरू असल्याने गंगापूर धरणात (Gangapur Dam) पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे धरणातून टप्प्या-...