Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील ८५ महाविद्यालयांची नॅक मूल्यांकनाची वैधता आता संपुष्टात

पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील ८५ महाविद्यालयांची नॅक मूल्यांकनाची वैधता आता संपुष्टात

पुणे |प्रतिनिधी|Pune

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील ८५ महाविद्यालयांची नॅक मूल्यांकनाची वैधता आता संपुष्टात आली आहे. नॅक मूल्यांकनाची वैधता संपलेल्या महाविद्यालयांमध्ये पुण्यातील नामांकित महाविद्यालयांचा समावेश असून, त्यांना लवकरात लवकर मूल्यांकन करून घ्यावे लागणार आहे.

- Advertisement -

यासंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता कक्षाच्या संचालक डॉ. सुप्रिया पाटील संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना दिलेल्या सूचनांनुसार, राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांनी अकृषि विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये यांना नॅक मूल्यांकन, करून घेण्यासंदर्भात वेळोवेळी कळविले आहे.

बहुसंख्य महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन, पूनर्मूल्यांकन प्रक्रियेत सहभाग घेऊन नॅककडून नॅक मान्यतेचा दर्जा प्राप्त करून घेतलेला आहे, परंतु त्यातील काही महाविद्यालयांची नॅक मूल्यांकनाची वैधता संपुष्टात आली आहे व त्यापुढील सायकलअंतर्गत महाविद्यालयांचे पूनर्मूल्यांकन व मानांकन करून घेतलेले नाही, अशा संलग्न महाविद्यालयांच्या व्यवस्थापन प्रतिनिधी, तसेच प्राचार्यांची ऑनलाइन कार्यशाळा बुधवारी घेण्यात आली.

एका प्राचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेली दोन वर्षे करोना सावट असल्यामुळे महाविद्यालयांमध्ये अपेक्षित कोणत्याही अॅक्टिव्हीटी राबविण्यास महाविद्यालयांना मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे नॅक समितीने संबंधित दोन वर्षे वगळून मूल्यांकनाची वैधता ठरविणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या