सिन्नर | Sinnar
मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील (Musalgaon Industrial Estate) सुदर्शन फ्युएल पेंट या रंगाच्या कंपनीच्या गोडाऊनला आग (Fire) लागल्याची घटना आज (दि. ७)सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली. मुसळगाव वसाहतीसह नगरपरिषद व एमआयडीसीच्या अग्निशामक बंबाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
मुसळगाव एमआयडीसीत (Musalgaon MIDC) वैभव गीते यांचा हा रंगाचा कारखाना (Color Factory) आहे. कारखान्याच्या आवारातच तयार असलेल्या मालासाठी गोडाऊन बनवण्यात आले आहे. या गोडाऊनला ही आग लागली. आग लागली दिसताच कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशामक दलाला संपर्क साधला. मुसळगाव वसाहतीसह सिन्नर नगरपरिषद व एमआयडीसीच्या बंबाने तातडीने घटनास्थळी गाव घेतली व आग आटोक्यात आणली.
आग विझली असे वाटत असतानाही आग धुमसतच होती. नगर परिषदेच्या अग्नीशामक बंबाला दोन खेपा कराव्या लागल्या. त्यानंतर आग पूर्ण आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत गोडाऊनमधील कलरचे बॉक्सेस व इतर अनेक साहित्य जळून खाक झाले. नुकसानीचा अंदाज अजून आलेला नसला तरी कारखान्याचे लाखो रुपयांचे नुकसान (Loss) झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे