Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन

नाशिक पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार शहरातील परिमंडळ दोनमध्ये विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

यादरम्यान रेकॉर्डवरील तसेच तडीपार अशा एकूण 37 गुन्हेगारांची तपासणी करून घरझडत्या घेऊन, चौकशी फॉर्म भरून कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे 31 टवाळखोरांवर कलम 112, 117 प्रमाणे कारवाई करून कोटपा कायद्यानुसार 18 गुन्हे दाखल करण्यात आले. अवैधरीत्या देशी दारुविक्री करणार्‍यांकडून 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे फरारी असलेला चोरीच्या गुन्ह्यातील एका संशयितास ताब्यात घेण्यात आले. तर मोटार वाहन कायद्यान्वये 3 गुन्हे दाखल करुन 1200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

समन्स, वॉरंटमधील संशयितांची चौकशी करून 12 जणांना समन्स, वॉरंट बजावण्यात आले. शहरात सध्या चोरी, वाहनचोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्याला रोखण्याबरोबरच रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरुध्द कारवाईसाठी परिमंडळ दोन मध्ये कोम्बिंग ऑपरेशन झाले.सातपूर, अंबड, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड व देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या मोहिमेत पोलीस उपायुक्त (परिमंडळ 2) मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख, आनंदा वाघ यांच्या नेतृत्वाखाली सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ निरीक्षक व महिला, पुरुष पोलिसांनी भाग घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या