Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन

नाशिक पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार शहरात कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले. यामध्ये अनेक गुन्हेगार ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात येऊन कारवाई करण्यात येत आहे.

- Advertisement -

कोम्बींग ऑपरेशन दरम्यान पोलीस आयुक्तालय हददीत एकुण १२८ रेकॉर्ड वरील गुन्हेगार, हिस्ट्रीशिटर चेक करून ६४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर पोलीस आयुक्तालय हद्दीतुन हद्दपार करण्यात आलेल्या ५१ जणांच्या घरी तपासणी करण्यात आली, त्यापैकी मिळून आलेल्या ११ जणांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तसेच एकुण ५८ टवाळखोरांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२/११७ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण पोलीस आयुक्तालयात कोम्बींग ऑपरेशन राबवुन पोलीसांची धडक कारवाई करण्यात आली. ३ मार्चच्या मध्यरात्रीपासून आज दुपारपर्यंत कोंबिंग ऑपरेशन सुरू होते. यामध्ये चोरी, घरफोडी चोरी, मोटार सायकल चोरीचे गुन्हेगारांना राहण्याचे संभाव्य ठिकाणी छापे टाकून त्यांना पोलीस स्टेशन मध्ये आणुन त्यांच्याकडे चौकशी करुन कारवाई करण्यात आली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

आडगांव, म्हसरुळ, पंचवटी, भद्रकाली, मुंबईनाका, सरकारवाडा, गंगापुर, सातपुर, अंबड, इंदिरानगर नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प या पोलीस ठाणे हद्दीत पोलीस ठाणे प्रभारी व गुन्हे शाखेकडील अधिकारी यांच्यासह फुलेनगर पंचवटी नाशिक, निलगिरीबाग, नांदुरनाका, अश्वमेध नगर, शांतीनगर, मखमालाबाद गांव, गंजमाळ, पंचशिल नगर, भारतनगर, मुंबईनाका, मल्हारखान, कस्तुरबा नगर, संतकबीर नगर शिवाजी नगर तसेच लेखा नगर घरकुल, चुंचाळे, कामटवाडा, प्रबुध्द नगर सातपुर गांव, अशोकनगर, वडाळागांव, राजीव नगर, पांडवनगर सुभाषरोड अश्विनी कॉलनी, सुंदरनगर, गांधीनगर, नारायण बापु नगर, भगुर व दे. कॅम्प परिसर या भागात कोम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या