Monday, June 22, 2026
HomeनगरShrirampur : फसवणूक करणार्‍या कंपनी विरुध्द पुढे येवून तक्रार नोंदवा

Shrirampur : फसवणूक करणार्‍या कंपनी विरुध्द पुढे येवून तक्रार नोंदवा

अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे गुंतवणूकदारांना आवाहन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारातील ग्रो इन्व्हेस्टर कंपनीमध्ये जादा परताव्याच्या अमिषाने ज्या-ज्या लोकांनी पैसे गुंतवलेले असतील त्यांनी स्वतःहून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे जबाब नोंदविण्यासाठी गुंतवणुकी बाबतचे कागदपत्रासह तात्काळ समक्ष हजर रहावे, असे आवाहन अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे.
भोकर शिवारातील ‘ग्रो इन्व्हेस्टर’ नावाच्या कंपनीकडून अहिल्यानगर व आजुबाजुच्या जिल्ह्यांमध्ये मोठा परतावा देण्याचे अमिष दाखवून सामान्य जनतेकडून मोठ्या रकमा स्विकारण्यात येत आहे.

- Advertisement -

व त्यामध्ये सामान्य नागरिक हे देखील पैसा गुंतवत आहेत, अशी गोपनिय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. अहिल्यानगर जिल्ह्यात अशा प्रकारचे अमिष दाखवून अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत यापूर्वी गुन्हेही दाखल करण्यात आले आहे. जर सदर प्रकरणाला वेळीच आळा घातला नाही तर पुन्हा नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसेल व संबधित कंपनीचे चालक पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलिसांनी ही कारवाई केल्याचे श्री. वाघचौरे यांनी सांगितले.

सदरची कंपनी खरोखरच नोंदणीकृत आहे काय? ठेवी स्विकारण्याबाबत काही परवाना आहे काय? एकूण किती लोकांकडून अशा ठेवी स्विकारण्यात आल्या आहेत? त्यापैकी काहींना परतावा मिळाला आहे काय? यामध्ये नेमके कोण कोण सामील आहे. या सर्व बाबींची माहिती घेणेकामी व संभाव्य गुन्ह्याचा प्रतिबंध करणेकामी दि. 26 डिसेंबर रोजी अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांच्या कार्यालयातील पथकाने व उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्यासह पोसई सतिष डौले, पोसई दादाभाई मगरे, पोहेकॉ दादासाहेब लोंढे, पोना संदीप दरंदले, पोकॉ सहदेव चव्हाण, पोकॉ अशोक गाढे, पोना.दादासाहेब गुंड, अनिल शेंगाळे, महिला पोकॉ. पुजा भावसार, अरुण पवार, मिरा सरग यांनी खासगी वाहनाने सदर ठिकाणी जावून छापा टाकला असता संदीपराज मोहिनीबाई कपाटे (वय 36), रा.हनुमानवाडी, भोकर शिवार, ता. श्रीरामपूर, हा मिळुन आला त्यास पथकाने त्यांची ओळख सांगुन त्यांना आपल्या घरात अनाधिकृतरित्या लोकांकडून पैसे घेवून वाढीव दराने कमी कालावधीत अधिकचा परतावा देण्याचे आमिष दाखवून आर्थिक गैरव्यवहार सुरु असल्याची बातमी मिळाली असून त्याकामी आपल्याकडे तसा लोकांकडून पैसे स्विकारण्याबाबत कोणत्याही प्रकाराचा परवाना आहे काय? याबाबत विचारणा केली असता त्याने त्याच्याकडे तसा परवाना नसलेबाबत सांगीतले.

त्यानंतर पथकाने त्याच्या घराची झडती घेतली असता त्याचे घरामध्ये 1 लाख 4 हजार 600 रुपये रोख रक्कमेसह इतर साहित्य मिळून आले आहे. यावेळी इन्व्हेस्टर कंपनीच्या चालक व मालक यांना खुलासा मागितला आहे मात्र त्यांनी कोणताही समाधानकारक खुलासा केलेला नसल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पोलिसांनी श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारात छापा टाकून 9 पासबुक, 10 चेकबुक, 1 हिशोब नोंदविलेली वही, 1 अ‍ॅपल कंपनीचा लॅपटॉप, 3 कॉम्प्युटर स्क्रिन, 2 पेड ड्राईव्ह, 1 कॅश काऊंन्टींग मशीन, 2 तिजोरी, 3 वॉकीटॉकी, 1 एचएचएमडी सह 1 लाख 4 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Jalgaon MLC Election : जळगाव विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे महाजन विजयी; मविआच्या...

0
जळगाव | प्रतिनिधी | Jalgaon विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून अपेक्षेप्रमाणे महायुतीचे (Mahayuti) नंदकिशोर महाजन (Nandkishor Mahajan) मोठया मतधिक्याने विजयी झाले आहे. महाजन...