मुंबई | Mumbai
आपल्या कॉमेडीने सगळ्यांना खळखळून हसवणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. गेल्या १० ऑगस्टला राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला.
जिममध्ये वर्कआऊट करत असतानाच ते कोसळले. तेव्हापासून दिल्लीच्या एम्स रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे. राजू यांचा ब्रेन जवळपास ‘डेड’ झाल्याचं म्हटलं जात आहे. डॉक्टरांनी देखील त्यांच्या वाचण्याच्या आशा सोडल्याची माहिती मिळत आहे.
राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध विनोदी कलाकार आहेत. ते अनेक लोकप्रिय टीव्ही शोचा भाग राहिले आहेत. त्यांची गणना देशातील सर्वोत्कृष्ट हास्यकलाकारांमध्ये केली जाते. राजू श्रीवास्तव ‘बिग बॉस’, ‘शक्तिमान’, ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’, ‘कॉमेडी सर्कस’ आणि ‘द कपिल शर्मा शो’चा हिस्साही राहिले आहेत. त्यांनी ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘आये आठवा खदानी रुपया’, ‘बिग ब्रदर’, ‘मै प्रेम कि दिवानी हू’, ‘बॉम्बे टू गोवा’ यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले.