दिल्ली | Delhi
कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Comedian Raju Srivastava) यांची प्रकृती नाजूक असून ते अजुनही दिल्लीच्या (Delhi) एम्समध्ये (AIIMS) व्हेंटिलेटरवर आहेत.
१० ऑगस्ट रोजी जिममध्ये व्यायाम करताना त्यांच्या छातीत दुखू लागले होते. त्याचवेळी ते जमिनीवर कोसळले होते. त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.
तत्पूर्वी राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबातील रजत श्रीवास्तव यांनी म्हटलं होत की, राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत पहिल्यापेक्षा अधिक सुधारणा झालेली दिसून येत आहे. दोन दिवसांनंतर ट्यूबच्या सहाय्यानं त्यांना दूध दिल्याचं देखील कुटुंबीयांनी म्हटलं होतं.
राजू श्रीवास्तव १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या पहिल्या सीझनमध्ये सहभागी झाल्यानंतर ते देशभरात लोकप्रिय झाले. ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘बॉम्बे टू गोवा’ आणि ‘आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपैया’ या चित्रपटातही त्यांनी काम केले.
राजू श्रीवास्तव ‘बिग बॉस सीझन 3’मध्येही सहभागी झाले होते. राजू यांच्या कॉमिक टायमिंगला आणि विनोदांना प्रेक्षकांची पसंती मिळते. राजू यांचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर देखील राजू अॅक्टिव्ह असतात.