Thursday, March 27, 2025
Homeमनोरंजनकॉमेडियन विजय राझ यांना पोलिसांकडून अटक

कॉमेडियन विजय राझ यांना पोलिसांकडून अटक

मुंबई । Mumbai

भिनेता विजय राज याला गोंदियात अटक करण्यात आली आहे. क्रू मेंबरमधल्या 30 वर्षीय युवतीची छेड काढल्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल करून विजय राजला अटक करण्यात आली.

- Advertisement -

विद्या बालन प्रमुख भूमिकेत असलेल्या शेरनी चित्रपटाच्या शुटींगदरम्यान मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात आणि गोंदियातील हॉटेल गेटवे येथे विजय राज यांनी पीडितेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित युवतीच्या तक्रारीवरून गोंदियातील रामनगर पोलिसांनी विनयभंग केल्याप्रकरणी कलम 354 (अ,ड) अन्वये गुन्हा दाखल करुन विजय राज यांना अटक केली आहे. अटक केल्यानंतर विजय राझ यांना पोलिसांनी कोर्टासमोर हजर केले. कोर्टाने नेमका काय निर्णय दिला याबाबत माहिती समजू शकली नाही. परंतू, पोलिसांनी प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.

राम गोपाल वर्मा यांच्या ‘जंगल’ चित्रपटातून विजय राज यांना फिल्मी जगतात पहिली संधी मिळाली. यानंतर तो महेश भट्ट यांच्या ‘भोपाल एक्स्प्रेस’ आणि ‘मॉन्सून वेडिंग’ चित्रपटात पीके दुबेच्या पात्रात दिसला. प्रेक्षकांना त्याची ही कॉमिक शैली आवडली. त्याच्या अभिनयाचे समीक्षकांकडूनही खूप कौतुक झाले. तसेच, या चित्रपटांत त्यांच्या कॉमिक शैलीसाठी त्याला अनेक नामांकने मिळाली. रघू रोमियो म्हणून राजला पहिला चित्रपट मिळाला. या चित्रपटातील त्याचे पात्र प्रेक्षकांसह समीक्षकांनाही आवडले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २७ मार्च २०२५ – उभारी देणारा उपक्रम

0
कोणत्याही सरकारी व्यवस्थांवर-सेवांवर सामान्यतः टीकाच केली जाते. विशेषतः सार्वजनिक आरोग्यसेवेचा उल्लेख केला तरी असंख्य तक्रारींचा पाऊस पडल्याचे अनेकदा आढळते. तथापि ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचा एक...