Saturday, November 23, 2024
Homeदेश विदेशमहिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा झटका; सणासुदीत LPG सिलेंडर दरात वाढ

महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा झटका; सणासुदीत LPG सिलेंडर दरात वाढ

दिल्ली | Delhi

आज ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस असून या पहिल्याच दिवशी महागाईचा मोठा झटका बसला आहे. तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढवल्या आहेत.

- Advertisement -

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ झाली आहे. नवीन दर मंगळवारपासून म्हणजेच १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाले आहेत. दर वाढल्यानंतर आता नवीन भावही समोर आले आहेत.

या वाढीनंतर राजधानी दिल्लीत १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत १७४० रुपये झाली आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर १८५०.५० रुपयांना मिळेल तर मुंबईत हा सिलेंडर १६९२.५० रुपयांना मिळेल.

व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर वाढल्यामुळे रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि हायवेवरील ढाब्यांवरील खाद्यपदार्थांच्या दरांवर परिणाम होऊ शकतो कारण या ठिकाणी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा वापर केला जातो.

याशिवाय तेल विपणन कंपन्यांनी गेल्या दोन महिन्यांत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमती वाढवल्या होत्या. सप्टेंबर आणि ऑगस्टमध्येही अनुक्रमे ३९ रुपये आणि ८ ते ९ रुपयांची वाढ झाली होती.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या