Saturday, July 6, 2024
Homeनगरआयुक्त जावळेंचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

आयुक्त जावळेंचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

आठ लाखांचे लाच प्रकरण; आज सुनावणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

आठ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी बुधवारी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज (4 जुलै) सुनावणी होणार आहे. एका बांधकाम व्यावसायिकाला आठ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी आयुक्त जावळे व स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

19 व 20 जून रोजी लाच मागणी पडताळणी झाल्यावर जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सलग तीन दिवस सापळा रचला होता. मात्र, ही कारवाई फोल ठरली. लाच मागणी पडताळणी दरम्यान देशपांडे याने लाच मागितली व आयुक्त जावळे यांनी त्याला प्रोत्साहन दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होण्याआधीच दोघेही पसार झाले आहेत.

आता आयुक्त जावळे यांनी अ‍ॅड. सतीश गुगळे यांच्यामार्फत जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने अर्ज दाखल करून घेत गुरूवारी सुनावणी ठेवली आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील फिर्यादीच्यावतीने अ‍ॅड. अभिजीत पुप्पाल यांनी वकीलपत्र दाखल केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या