Sunday, September 29, 2024
Homeनगरशासनाच्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा

शासनाच्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा

आयुक्त डॉ. गेडाम || जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ सर्वसामान्यांना सुलभतेने घेता यावा यादृष्टीने नियोजन करत या महत्वाकांक्षी योजना जिल्ह्यात प्रभावीपणे व गतिमानतेने राबविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ.प्रविण गेडाम यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजनांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते. विभागीय आयुक्त डॉ.गेडाम म्हणाले, राज्य शासनाच्या फ्लॅगशिप योजनांपैकी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना असून या योजनेंतर्गत जिल्ह्यात 7 लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.

- Advertisement -

या योजनांचा लाभ महिला लाभार्थ्यांना सुलभतेने घेता यावा यादृष्टीने योजना राबवावी. योजना राबविण्यात काही तांत्रिक अडचणी येत असतील तर त्यांची प्राधान्याने सोडवणूक करावी. ज्या महिला लाभार्त्यांचे बँक खाते आधार क्रमांकसोबत अद्यापही जोडण्यात आलेले नाहीत ते तातडीने लिंक करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. मुख्यमंत्री- युवा कार्य प्रशिक्षण योजनेव्दारे युवकांना खासगी तसेच शासकीय, निमशासकीय आस्थापनेवर प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील युवकांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ज्या तीर्थक्षेत्राला भेट द्यावयाची इच्छा असेल त्यादृष्टीने या तीर्थदर्शनचे सुयोग्य नियोजन करण्यात यावे. मुख्यमंत्री वयोश्री योजना, अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना या योजनांचाही आयुक्त गेडाम यांनी आढावा घेतला.

नवीन मतदारांची नोंदणी करावी
1 जुलै, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने विभागातील राजकीय पक्षांसमवेत आयुक्त डॉ. गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नवीन मतदारांची अधिकाधिक नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. मतदार यादी अधिक अचूक व पारदर्शक होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रतिनिधींची नेमणूक करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या