Saturday, July 6, 2024
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक महानगरपालिकेचे आयुक्त मुंबईत; बदलीची चर्चा कायम

नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त मुंबईत; बदलीची चर्चा कायम

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या बदलीची जोरदार चर्चा मागील दोन दिवसांपासून सुरू आहे. त्यातच आज आयुक्त हे मुंबईला रवाना झाल्यामुळे त्याला आणखी बळ मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर बदलीची फाईल असून कोणत्याही क्षणी त्यांची बदली होण्याची शक्यता आहे.

दरम्यान आयुक्त करंजकर यांनी बदली होऊन कुठे जायचं याबाबत शासनाला काही ठिकाणांची यादी दिल्याचे समजते. मात्र ज्या ठिकाणी त्यांनी बदली मागितली आहे, ती जागा सध्या रिक्त झाली नसल्यामुळे बदली उशिरा देखील होण्याची शक्यता आहे. आयुक्त डाॅ.अशोक करंजकर आज गुरुवारी (दि.२७) सायंकाळी तातडीने मुंबईला मंत्रालयाकडे निघाले. येत्या एक दोन दिवसात त्यांच्या बदलीची आ‍ॅ‍ॅर्डर निघू शकते असे बोलले जात असून पसंतीच्या ठिकाणी बदलीसाठी त्यांचे प्रयत्न सुरु असल्याचे समजते.

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून आगामी निवडणुकीपुर्वीचे हे शेवटचे अधिवेशन ठरणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर बदल्यांचा बार उडणार असे समजते. नाशिक मनपा आयुक्त डाॅ. करंजकर यांच्या बदलीची मागील दोन तीन दिवसांपासून जोरात चर्चा मनपा वर्तुळात सुरु आहे. आयुक्तपदी रुजू होऊन इनमिन एक वर्ष झाले असताना त्यांच्या बदलीच्या चर्चेने आश्वर्य व्यक्त केले जात आहे. त्यातच त्यांनी गुरुवारी तातडीने मंत्रालयाकडे प्रस्थान केल्याने चर्चेला आणखी हवा मिळाली आहे.

अडीच वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने हजारो कोटींचे विकासकामे होणार आहेत. त्यामुळे मनपा आयुक्तपदासाठी अधिकार्‍यांमध्ये जोरदार लाॅबिंग सुरु असल्याचे कळते. आगामी विधानसभा निवडणुका व कुंभमेळा या अनुषंगाने सत्ताधारी भाजपकडून त्यांच्या मर्जीतील अधिकारी बसविण्याचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या