Saturday, September 14, 2024
Homeनगरआयुक्तांवर दप्तर दिरंगाईची कारवाई करा

आयुक्तांवर दप्तर दिरंगाईची कारवाई करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

महानगरपालिकेचे अभियंता के. वाय. बल्लाळ यांना पदोन्नती देणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यास

आयुक्त श्रीकांत मायकलवार हे टाळाटाळ करत असून, त्यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी कार्यकर्ते शाकिर शेख यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

नगरविकास मंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनात शेख यांनी म्हटले आहे, महापालिकेचे अभियंता बल्लाळ यांना दिलेली पदोन्नती बेकायदेशीर आहे. त्यांना पदोन्नती देणारे अधिकारी व कर्मचार्‍यांविरोधात कारवाई करण्याचा आदेश नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी सु. द. धोंडे यांनी 22 सप्टेंबर रोजी दिलेला आहे.

या आदेशानुसार आस्थापना विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावावर महापालिकेच्या आयुक्तांकडून कार्यवाही होणे अपेक्षित होते. परंतु आयुक्त मायकलवार यांनी यासंदर्भात विधी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याबाबत कळविले.

तसेच बल्लाळ यांच्याविरोधात नगरविकास खात्याकडे अनेक तक्रारी दाखल असताना बल्लाळ यांना विद्युत विभागातून नगररचना विभागाच्या उपअभियंतापदी नियुक्ती देण्यात आली असून, शासनाच्या आदेशाकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या