मुक्ताईनगर । प्रतिनिधी
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील तीस वर्षापासून रखडलेल्या विकासाला गतिमान करण्यासाठी मायबाप जनतेने 2019 मध्ये निवडून दिले. त्यानंतर चार ते पाच वर्षाच्या कालावधीत मतदारसंघाच्या विकासासाठी शेकडो कोटींचा निधी आणला. आता विकसित आणि समृद्ध व राज्यातील आदर्श असा मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ बनविण्यासाठी सदैव कटिबद्ध असून त्यासाठी व्हिजन तयार असून जनतेने हे स्वप्न साकार करण्यासाठी पुन्हा एकदा सेवेची संधी उपलब्ध करून द्यावी असे आवाहन महायुतीचे उमेदवार असलेले आ.चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्याचे नेते गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, अनिल पाटील तसेच केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची तसेच मतदारांची खंबीर साथ असल्याने आ.चंद्रकांत पाटील यांना विजयाचा आत्मविश्वास आहे.
मुक्ताईनगर मतदार संघात मुक्ताईनगर बोदवड व रावेर तालुक्यातील गावांमध्ये मंजूर व प्रगतीत जलजीवन मिशन अंतर्गतच्या पाणीपुरवठा योजनांना तातडीने पूर्ण करण्यासाठी व ही गावे टंचाई मुक्त करण्यासाठी कटिबद्ध आहेत. मतदारसंघात दर्जेदार आरोग्य शिक्षण रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहून एमआयडीसीच्या माध्यमातून लघुउद्योग मोठे उद्योग शेतीमाल प्रक्रिया उद्योग उभारणी तसेच व्यापारी संकुलांच्या माध्यमातून छोटे-मोठे व्यवसाय वृद्धीस चालना देऊन मतदारसंघातील बाजार पेठ सक्षम करणार आहे.
वन पर्यटन तसेच धार्मिक पर्यटन स्थळांच्या माध्यमातून भाविकांना आणि पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास या देहातून मायबाप जनतेचे आशीर्वाद मिळावे, त्यासाठी मायबाप जनतेने खंबीरपणे पाठीशी उभे राहावे व मतदानरुपी आशीर्वादाने विजयाची पताका फडकवावी, असे नम्र आवाहन केले आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासाठी आ.चंद्रकांत पाटील यांनी वचननामा सादर केलेला आहे.
त्या वचननाम्या नुसार मतदारसंघातील रखडलेले सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करून मतदार संघातील शेतजमीन सिंचनाखाली आणणार. मतदार संघातील शहरी व ग्रामीण भागातील अतिक्रमित घरांची जागा शासन निर्णयानुसार नियमाकुल करून देणार, मतदार संघातील गाव तिथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र उभारणार, औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून उद्योग उभारून बेरोजगार तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देणार, मतदार संघातील सर्व शेती व शिवरस्ते नियोजन आराखड्यात घेऊन डांबरीकरण करणार, हतनूर प्रकल्पातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील अनेक वर्षांपासून रखडलेले उर्वरित बाधित गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार, मतदार संघातील अल्पसंख्याकांसाठी मूलभूत सोयी सुविधा पुरविणार, असे मतदार संघाला समृद्ध व विकसित बनविणारे व्हिजन आ.चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे.