Friday, November 22, 2024
Homeनगरशिक्षण क्षेत्रातील प्रश्नांच्या अभ्यासासाठी समिती

शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांच्या अभ्यासासाठी समिती

नगर जिल्ह्यातील सहा जणांचा समावेश

  • संदीप वाकचौरे

    संगमनेर – राज्यातील विविध शैक्षणिक प्रश्नांसंदर्भात अभ्यास करण्यासाठी व शासनास योग्य त्या शिफारसी करण्यासाठी शिक्षण आयुक्त यांनी एकूण 33 अभ्यास गटाची स्थापना केली आहे. या अभ्यास गटात अहमदनगर जिल्ह्यातील सहा जणांचा समावेश आहे.

    - Advertisement -

राज्यात गेली काही वर्ष शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये होणारे विविध प्रकारचे बदल त्यातून निर्माण झालेल्या समस्या तसेच राज्यातील विविध संघटनांच्या असलेल्या मागण्या या सर्व पार्श्वभूमीवर अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अभ्यासगटाने शासनाला योग्य त्या शिफारशी करणे अपेक्षित आहे.

त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातले रहिवासी व राज्याचे शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण हक्क कायद्यातील प्रवेश प्रक्रिया, अनुदानित विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयं अर्थसाहित शाळेमधील शुल्क आकारणी व मध्यान्न भोजन योजनेची प्रभावी अंमलबजावणी या समित्यांचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आलेले आहेत.

अहमदनगर जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांची सदस्य म्हणून शालेय मूल्यमापन व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील पटसंख्या वाढविण्यासाठीच्या उपाययोजना सुचविणे या समितीत समावेश करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेचे उपशिक्षण अधिकारी अरुण धामणे यांचा संचमान्यता व अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन या अभ्यास गटात समावेश करण्यात आला आहे.

अहमदनगरचे रहिवासी असलेले जि.प. ठाण्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांचा महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती अधिनियम 1977 व नियम 1981 अभ्यास गटात समावेश करण्यात आला आहे. तसेच इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया या गटातही समावेश करण्यात आला आहे.तर अकोले तालुक्याचे रहिवासी असलेले कोल्हापूरचे उपसंचालक सुरेश आवारी यांचा व्यावसायिक शिक्षण या अभ्यास गटावर नियुक्ती करण्यात आली आहे.
मती सुनंदा ठुबे प्राथमिक शिक्षणाधिकारी सांगली यांचा स्वयम् अर्थसाहित शाळांचे सनियंत्रण या गटात समावेश करण्यात आला आहे.

मुस्ताक शेख शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांचा खाजगी शिकवणी वर्गातील सनियंत्रण अभ्यास गटात समावेश करण्यात आला आहे. संगमनेर येथील जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या प्राचार्य श्रीमती अचला जडे यांची पूर्व प्राथमिक शाळांचे नियोजन या अभ्यास गटाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

या आहेत समित्या-शिक्षण आयुक्त यांनी नियुक्त केलेल्या विविध समित्यांमध्ये शिक्षण हक्क कायदा प्रवेश प्रक्रिया,इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया.अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहायित शाळा मध्ये शुल्क आकारणी. महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी अधिनियम 1977 नियम 1981. संचमान्यता व अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन. शिक्षकांना वेतन अनुदान देणे ऐवजी प्रति विद्यार्थी अनुदान देणे.शाळा व विद्यार्थ्यांच्या छळाच्या तक्रारी निवरण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करणे.

विभागीय चौकशी व कार्य निरीक्षणे.दप्तराचे ओझे कमी करणे .एकाच परिसरातील विविध संस्थांनी चालविलेल्या शाळांचे एकत्रीकरण. मुख्याध्यापकांची पदे सरळसेवेने भरणे बाबत. केंद्रप्रमुख या पदाचे सक्षमीकरण. सैनिकी शाळा व विद्यानिकेतन यांची गुणवत्ता वाढविणे. न्यायालयीन प्रकरणाचा त्वरित निपटारा करण्याची योजना. मध्यान्न भोजन योजनेची प्रभावी अंमलबजावणी. पूर्व प्राथमिक शाळांचे नियोजन. डी. एल .डी आणि बी.एड अभ्यासक्रमाची उपयोगिता निश्चित करणे. स्वयम् शाळांचे सनियंत्रण. अल्पसंख्यांक शाळांचे व्यवस्थापन. खाजगी शिकवणी वर्गात सनियंत्रण. विविध स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने इयत्ता अकरावी बारावीच्या अभ्यासक्रमाचे परीक्षण करणे .शिक्षक मुख्याध्यापकांची अशैक्षणिक कामे कमी करण .

महानगर पालिका शाळांची गुणवत्ता वाढविणे. उर्दू माध्यमिक शाळांची गुणवत्ता विकास. निरंतर शिक्षणाधिकारी यांची भूमिका व कार्य. लोकसहभाग सहभाग वाढविणे. शालेय मूल्यमापन. व्यावसायिक शिक्षण व स्थलांतरित मुले .शालेय शिक्षण स्तरावरील शिष्यवृत्ती सुधारणा समिती. अर्थसंकल्प तयार करणे व लेखाविषयक बाबींचे सुलभीकरण. कार्यालयाची रचना व कार्यपद्धती अभिलेख पद्धती तसेच माहिती अधिकार अभिलेख बाबत जाणीव जागृती. शासकीय व स्थानिक स्वराज संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी उपाययोजना सुचविणे .या गटांचा समावेश असणार आहेत.

शिक्षकांना वेतनाऐवजी प्रतिविद्यार्थी अनुदान अभ्यास गट
राज्यातील शिक्षकांना सध्या विद्यार्थी संख्येवर वेतन न देता त्यांना वेतन आयोगातील वेतनश्रेणीप्रमाणे वेतन देण्यात येत आहे. मात्र त्याऐवजी प्रतिविद्यार्थी अनुदान देणे संदर्भाने अभ्यास करण्यासाठी अभ्यास गट निश्चित करण्यात आला आहे.प्रति विद्यार्थी अनुदान संस्थेत देण्याबाबतचा अभ्यास करण्याची सूचना यापूर्वी देण्यात आलेली होती. त्यानुसार शिक्षकांना वेतन अनुदान देण्याऐवजी प्रतिविद्यार्थी अनुदान संस्थेस अदा केल्यास शासनाच्या आर्थिक बळावर, प्रशासकीयदृष्ट्या काय परिणाम होईल याचा अभ्यास करणे. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर काही परिणाम होऊ शकेल का याचा अभ्यास हा अभ्यासगट करणार आहे.  या अभ्यास गटात राज्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील अध्यक्ष असणार असून, त्यात प्रभावती कोळेकर,दीपक माळी, श्रीमती झनकर या शिक्षण अधिकाराचा समावेश आहे. हनुमंत जाधव उपशिक्षणाधिकारी हे सदस्य असणार आहेत. तर सचिव म्हणून राजेश्वरी चंदनशिवे अधीक्षक या काम पाहणार आहेत. या समितीच्या अहवालावर ती राज्याच्या सर्व शिक्षकांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे या अभ्यास गटाचा शिफारसी काय येतात याकडे राज्याच्या शिक्षकांचे लक्ष लागून राहणार आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या