Tuesday, July 16, 2024
Homeमुख्य बातम्यादिव्यांगांचा सर्वांगीण विकास सामुदायिक जबाबदारी: महसूल आयुक्त गमे

दिव्यांगांचा सर्वांगीण विकास सामुदायिक जबाबदारी: महसूल आयुक्त गमे

नाशिक रोड । प्रतिनिधी | Nashik Road

- Advertisement -

शासनाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या सर्व योजनांमध्ये दिव्यांगांना (disabled) लाभ मिळवून देणे व त्यातून त्यांचा सर्वांगीण विकास (holistic development) करणे ही समाजातील सर्व घटकांची सामुदायिक जबाबदारी आहे.

तसेच, सर्व प्रशासकीय यंत्रणांनी दिव्यांगांच्या कल्याणासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Revenue Commissioner Radhakrishna Game) यांनी व्यक्त केले आहे. विभागीय आयुक्त (महसूल) नाशिक विभाग नाशिक (nashik), प्रादेशिक उपायुक्त (Regional Deputy Commissioner), समाज कल्याण

आणि नॅब डॉ. मोडक रिसर्च अँड रिहॅबिलिटेशन सेंटर नाशिक (Dr. Social Welfare and NAB. Modak Research and Rehabilitation Center Nashik) यांच्या संयुक्त विद्यमाने आज विभागीय आयुक्त कार्यालयात विभागातील सर्व यत्रणांचे अधिकारी यांच्यासाठी जिल्हा वार्षिक योजना (District Annual Plan) व सर्व विकास योजनांमध्ये दिव्यांगांना लाभ मिळणे सुनिश्चित करणे बाबत प्राधिकृत/सक्षम अधिकार्‍यांची जबाबदारी या विषयावर कार्यशाळा (workshop) आयोजित करण्यात आली होती.

याप्रसंगी गमे बोलत होते. दिव्यांग (disabled) प्रश्न म्हटला म्हणजे समाज कल्याण (social welfare) किंवा दिव्यांग आयुक्तालय पुरता मर्यादित नसून सर्व शासकीय यंत्रणांची भूमिका त्यात अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वांनी सामुदायिक प्रयत्न त्यासाठी केल्यास निश्चितच दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे. दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी व त्यांच्या कौटुंबिक कल्याणासाठी दीर्घकालीन उपाय योजना सर्व शासकीय कार्यालयांनी करणे अत्यंत महत्त्वाचे काळाची गरज असल्याचेही गमे यांनी नमूद केले.

दिव्यांगांच्या विकासासाठी व त्यांच्या कल्याणासाठी विविध विभागांच्या जबाबदार्‍या व त्यांच्या वतीने करण्यात येणार्‍या उपायोजना, विकास योजना या बाबींवर सर्व विभाग प्रमुखांनी चर्चेत सहभाग घेत अधिक प्रभावीपणे योजनाची अंमलबजावणी करण्याचे सर्वानुमती यावेळी निश्चित करण्यात आले.

या कार्यशाळेस जिल्हाधिकारी गंगाधरण डी. (Collector Gangadharan D.), मनपा आयुक्त डॉ. पुलकुंडवार (Municipal Commissioner Dr. Pulkundwar), जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल (Zilha Parishad Chief Executive Officer Ashima Mittal), समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. भगवान वीर, शाहीन शेख, सेक्रेटरी नॅब, विजय कान्हेकर, पल्लवी कदम

यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील (nashik district) सर्व प्रशासकीय यंत्रणांचे कार्यालय प्रमुख सदर कार्यशाळेत उपस्थित होते तर ऑनलाईन (online) पद्धतीने नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, सर्व आयुक्त महानगरपालिका, सर्व प्रांत अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तसेच सर्व विभागांचे जिल्हाप्रमुख ऑनलाईन बैठकीद्वारे सहभागी झाले होते. सूत्रसंचालन विजय कान्हेकर तर योगेश पाटील यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या