Friday, May 31, 2024
Homeमुख्य बातम्याटोल कंत्राटदारांना भरपाई!

टोल कंत्राटदारांना भरपाई!

नाशिक । प्रतिनिधी Nashik

व्यवसायात घट झालेल्या राज्यातील 14 टोल कंत्राटदारांना 173 कोटी रुपये नुकसान भरपाईचा पहिला हप्ता देण्याचा प्रस्ताव राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) तयार केला आहे.

- Advertisement -

लॉकडाउनच्या काळात 25 दिवस वाहतूक बंद असल्यामुळे ही रक्कम देण्यात येणार असल्याचे समजते. 23 मार्चपासून लॉकडाउन जाहीर झाला. त्यामुळे राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यामुळे केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने संपूर्ण देशात टोलबंदी करण्याचा निर्णय घेतला. नंतर 20 एप्रिलपासून हा निर्णय रद्द करण्यात आला. त्यानंतरही रस्त्यावर वाहतूक खूप कमी झाल्याने टोलवसुली कमी झाली.

त्यामुळे टोल कंत्राटदारांना टोलबंदीच्या व नंतरच्या काळातही नुकसान सहन करावे लागले. यामुळे केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने आणि अर्थ मंत्रालयाने देशभरातील टोल कंत्राटदारांना नुकसान भरपाई देण्याचे धोरण ठरवले. त्यामध्ये टोलबंदीच्या काळात आणि नंतर रहदारी पूर्वीच्या पातळीवर येईपर्यंतच्या काळात टोल कंत्राटदारांना नुकसान भरपाई देण्याचे निकष मंत्रालयाने ठरविले आहेत.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने आपल्या अखत्यारीत येणार्‍या 14 टोल कंत्राटदारांना (पुणे- मुंबई द्रुतगती मार्गासह) टोलबंदीच्या 25 दिवसाच्या काळात झालेल्या नुकसानीचा हिशेब करून 173. 57 कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाला तो नुकताच सादर केला आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही, असे कळते.

माहिती अधिकारातंर्गत अर्ज केल्यावर त्याला उत्तर देताना राज्य रस्ते विकास महामंडळाने या टोल कंत्राटदारांना देण्यात येणार्‍या नुकसान भरपाईच्या रकमेचे तपशील दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या